नांदेड दि. 20 -लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था
अबाधित राहण्यासाठी
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.पोलीस,महसुल, इन्कम टॅक्स, परिवहन,
वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क,प्राप्तीकर,सिमा सुरक्षा बल,अंमली पदार्थ नियंत्रण दल,
डाक विभाग, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, नागरी उड्डयन विभाग
अं मलबजावणी संचालनालय विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.
आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
यांनी दिले आहेत.जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य व 16 लाखाचे
अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. रोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या
यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला हि कोणाची हि गय न करता करा
असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.