लोकसभेचे आचारसंहिता कुठल्याही क्षणी
लागू शकते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
व त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा धडाका
लावला आहे यामध्ये त्यांनी मागील दोन दिवसांमध्ये
वेगवेगळ्या मंत्रालयाचे 269 जीआर काढले कारण
एकदा आचारसंहिता लागली की निवडणुका पूर्ण
होईपर्यंत कुठलाही शासन निर्णय घेता येत नाही
त्यामुळे सध्या जीआर करण्याचा सपाटा
एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने लावला आहे
सामान्य माणूस त्यांच्या जी आर साठी
वाट पाहत बसतो खुर्चीवर बसलेल्या
सत्ताधाऱ्यांच्या मनात आल्यावर ते त्यांना
पाहिजे तशा पद्धतीने त्या वेळेतच निर्णय घेतात
आणखी किती निर्णय होतात ते पाहावे लागेल