लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या व परत एकदा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले पण
या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीला तसेच एनडीएला उत्तर प्रदेश महाराष्ट्र
पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपयश येताना दिसले एकंदरीत प्रत्येक राज्यामध्ये
याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात पण महाराष्ट्राच्या निवडणुकी मध्ये एकूण दहा कारणे ज्यामुळे
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना कमी जागा मिळाल्या या मागची कारणे काय आहेत याविषयी आपण चर्चा करूया
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला अपयश यायच्या मागे कारणे आहेत
1)मराठा आंदोलकांवर झालेला लाठी चार्ज (Lathi charge on Maratha protesters)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा सेवाआरक्षणाच्या मागणीसाठी
अमर उपोषणाला बसले होते व येथे पोलिसांकडून आंदोलकांवर अमानुष लाठी चार्ज केला गेला त्यामुळे
या लाठीचार्ज पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले व मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला
या घटनेमुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला व त्यानंतर मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी
मिळून ओबीसी परिषद घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करायला चालू केले छगन भुजबळ हे महायुतीत मंत्री
असल्यामुळे मराठा समाजाचा रोष हा महायुतीकडे गेला व त्यामुळे मराठा समाजाने महायुतीला मतदान करणे टाळले
2)कांदा प्रश्न (Onion question)
केंद्र सरकारने आपल्या देशातून कांद्या निर्यातीवर बंदी घातली याचे कारण होते देशांतर्गत वाढलेले कांद्याचे दर यामुळे
सरकारने निर्यात बंदीचे धोरण आखले पण यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव पडले थेट 40 रुपयांवरून कांदा
दोन ते तीन रुपये किलो विकला जाऊ लागला यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले वारंवार आंदोलन करून
देखील सरकारने याची दखल घेतली नाही व शेवटीला सरकारने एक निर्णय जाहीर केला की आम्ही लाल नाही तर पांढरा
कांदा निर्यातला मान्यता देत आहोत लाल कांद्यावर निर्यात बंदी तर पांढऱ्या कांद्यावर निर्यात उठवण्याचा असा अजब
निर्णय सरकारने घेतला तसा महाराष्ट्रामध्ये लाल कांदा जास्त पिकतो पांढरा कांदा जास्त पिकत नाही त्यामुळे या निर्णयामुळे
शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाली याचाही फटका महायुतीला महाराष्ट्रात बसल्या दिसलं या कांदा प्रश्नामुळे दिंडोरी
मधून विद्यमान केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या पराभूत झाल्या
3)संविधान बदलण्याची भीती (Fear of changing the constitution)
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार 40 पार हा नारा दिला व हा नारा दिल्यानंतर
भारतीय जनता पार्टीच्या काही खासदारांनी बीजेपी 400 पार झाली तर आम्ही देशाचे संविधान बदलू अशा पद्धतीचे भाष्य
केले व त्यामुळे सबंध भारतातील संविधान प्रेमींना ही गोष्ट पटली नाही व त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्ही संविधान
बदलू देणार नाही असं म्हणत भारतीय जनता पार्टीला मतदान केले नाही तसंच काही महाराष्ट्रात पण घडलं
4)उद्योगधंदे गुजरातला नेने (Take industries to Gujarat)
मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातून अनेक उद्योग व्यवसायिकांनी महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये जाण्याचा निर्णय घेतला यामध्ये
काही जुने प्रकल्प तर काही येणाऱ्या प्रकल्पांचाही समावेश होता यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये सर्व उद्योगधंदे जर गुजरातला
गेले तर मराठी माणसांनी काय करायचं असा प्रश्न मनात तयार झाला व यामुळे मतदारांनी आपला राग हा ईव्हीएम मशीन मध्ये
नोंदविला त्याचाही खूप मोठा फटका हा भारतीय जनता पार्टी व महायुतीला बसला
5) फोडाफोडीचे राजकारण (The politics of extortion)
एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टीच्या सोबत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केली व झाले तसेच
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या पावरावर पाऊल ठेवत आपल्या काकांविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत असलेल्या सरकारमध्ये सामील झाले व राज्याचे उपमुख्यमंत्री झाले
पण या दोन्हीही थोडाफोडीला भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडवणीस जबाबदार असल्यास चे वक्तव्य उद्धव ठाकरे व शरद पवार या
दोघांनी मी केले सत्ता बदल झाला पण हा बदल महाराष्ट्रातल्या जनतेला आवडला नाही त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी महायुतीला
मतदान करणे टाळल
6)उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बद्दलची सहानुभूती (Sympathy for Uddhav Thackeray and Sharad Pawar)
महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फोडल्यानंतर व त्यांनी स्थापन केलेली सत्ता यामुळे एकनाथराव शिंदे व अजित दादा पवार या दोघांवरही
महाराष्ट्रातली जनता नाराज असल्याचे दिसते त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांना पटले नाही अजित दादा पवार व एकनाथराव शिंदे या
दोघांनीही आपला पक्ष व चिन्ह वाचण्यासाठी पोटापर्यंत लढा दिला व या लढ्यामध्ये या दोघांनाही यश आलेले दिसले तसेच मराठी माणूस
मुंबईमधील हे कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे राहिलेले आहेत व शिवसेना जरी कुठली तरी सुद्धा बाळासाहेबांनंतर मतदारांनी
आपला कौल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने द्यायला सुरुवात केलीव त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये
सहानुभूती निर्माण झाली व या सहानुभूती मुळेच मतदारांनी महायुतीला मतदान केले नाही याचाही मोठा फटका हा महायुतीला बसल्याचे
दिसत आहे
7)प्रखरतेने झालेला धर्माचा प्रचार (Vigorous preaching of religion)
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांनी केलेला प्रकल्प हिंदुत्वाचा प्रचार हा सुद्धा अल्पसंख्यांक व त्यातल्या त्यात
मुस्लिम समाजाला आवडलेला नाही त्यामुळे मुस्लिम समाजाने महायुतीकडे पाठ फिरवली व महा विकास आघाडीला मतदान करण्याचा
निर्णय घेतला याचाही खूप मोठा फटका हा महायुतीला सबंध महाराष्ट्रात पाहायला मिळाला हे सुद्धा एक भारतीय जनता पार्टी व महायुती
मधील घटक पक्ष यांना पराभूत होण्यासाठी ही एक कारण आहे
8)ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली (He established power with those he accused of corruption)
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रामधील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले व या मध्ये
प्रामुख्याने अजित दादा पवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण या दोघांना दोघांवरही मोठ्या प्रमाणात आरोप केले पण जेव्हा
अजित दादा पवार यांनी आपल्या काकाची साथ सोडून ते सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांना भारतीय जनता पार्टीने नुसतं सत्तेत घेतलेला नाही
तर त्यांना मंत्रीही केले यामुळे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आपण आता का बसत आहात असा प्रश्न
विरोधक विचारू लागले व यावर भारतीय जनता पार्टीला समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही त्यामुळे सुद्धा जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात
महायुती बद्दल नाराजी तयार झाली
9) ईडी व सीबीआयने केलेल्या कारवाया(Actions taken by ED and CBI)
भ्रष्टाचाराच्या व इतर आरोपाखाली ई डी व सीबीआयने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया केल्या पण या कारवाईच्या वेळी विरोधकांनी
या कारवाया म्हणजे जाणून बसून केल्या आहेत असा आरोप केला व त्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करत आहे अशी लोकांची
मानसिकता तयार झाली रोहित पवार यांच्यावर झालेले आरोप त्यांची लागलेली चौकशी यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये नाराजी दिसून
आली व निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ही नाराजी स्पष्टपणे दिसू लागली
10))दिल्लीमधील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers’ movement in Delhi)
दिल्ली हरियाणा पंजाब सीमेवर शेतकऱ्यांचे एक मोठे आंदोलन उभे राहिले व या आंदोलनामुळे सरकारला दोन पावलं माझं सरकार लागलं
पण यावेळी झालेल्या आंदोलनात का हे सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे अशा पद्धतीची मानसिकता विरोधकांनी महायुतीच्या बद्दल
मतदारांच्या मनामध्ये तयार करून दिली व बहुतांशी असलेल्या शेतकरी मतदारांनी तिसरा पर्याय निवडला त्यामुळे सुद्धा महायुतीला मोठ्या
प्रमाणात अपयश आलेले आम्हाला दिसले
वर दिलेली दहा कारणे व त्यापेक्षा काही वेगळे करणे सुद्धा भाजपाच्या व महायुतीच्या पराभवासाठी असू शकतात पण एकंदरीत वरील सर्व
गोष्टी या प्रत्येक राज्यामध्ये तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी असू शकतात पण एकंदरीत आपण जर विचार
केला तर ही दहा प्रमुख कारणे ही भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या अपयशाची तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या
निवडणुका आहेत व या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार काहीतरी मोठे निर्णय घेऊन या 10 कारणानं मुळे जे मतदान झाले नाही त्या
मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मोठे निर्णय सरकारला येते पाहिजे अन्यथा लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये सुद्धा या कारणांचा खूप
मोठा प्रभाव हा सरकारला पाहावा लागेल
Recent News
महाराष्ट्रात महायुतीला अपयश येण्याची १० कारणे
भाजपा अब कि बार चे ४०० पारचे स्वपन का भंगले
Add A Comment