मराठा आरक्षण प्रश्न वर बोलताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल उधळला मग उपोषण कशाला अशी प्रतिक्रिया दिली
एका पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर शासनाने सर्व मागण्या मान्य केल्यात असे सांगितले याचा गुलाल देखील उधळला मग दहा फेब्रुवारीपासून उपोषण कशासाठी असाच सवाल ठाकरे यांनी केला
मी जेव्हा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर सांगितले होते की हा तांत्रिक विषय आहे कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे
अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालयत जावे लागेल साठी
विशेष अधिवेशन बोलावे लागेल ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही असे मी सर्वांसमोर जरंगे पाटील यांना सांगितले होते
जर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तर आता परत उपोषण कशासाठी
मी थोडं कडक बोलतोय असे वाटेल पण सत्य हेच आहे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर परत एकदा आरोप प्रती आरोप सुरू होतील